नीरा भीमा कारखान्यावरती शंकररावजी पाटील यांना अभिवादन
फोटो:- नीरा भीमा कारखान्यावरती कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी हर्षवर्धन पाटील व इतर.
इंदापूर : प्रतिनिधी दि.11/3/21
शहाजीनगर येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती जेष्ठ नेते, कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.11) प्रतिमेचे पूजन करून माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, पोलीस अधिकारी बाळासाहेब शिंदे, प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
________________________________

