shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री आणि तांबवा येथील तांबवेश्वर मंदिर महाशिवरात्री दिवशी बंदच..!!


तहसीलदारांनी भेट देऊन केली पहाणी..!! 

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश :
केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री आणि तांबवा येथील तांबवेश्वराचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने प्रतिवर्षा प्रमाणे भरणारी भव्य यात्रा भरली नाही.


जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णामुळे जिल्हा प्रशासनाने संसर्ग टाळण्यासाठी कोव्हिड प्रतिबंध आदेशानुसार सर्व आठवडी बाजार, यात्रा आणि शाळा या बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे दि.१० मार्च रोजी महाशिवरात्री च्या मुहूर्तावर उत्तरेश्वर पिंप्री येथे भरणारी उत्तरेश्वर यात्रा व तांबवा येथील तांबवेश्वर देवस्थानची यात्रा भरली नाही. केज तालुक्यातील दोन्ही मंदिरे प्रशासनाने बंद ठेवली आहेत. तसेच पुजाऱ्याना व मंदिर समिती आणि ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत. 



दरम्यान तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी आज मंदिर परिसरात भेटी देऊन परिस्थितीची पहाणी केली. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

मंदिर परिसरात दिनकर पुरी, अमोल गायकवाड, धनपाल लोखंडे, हनुमंत चादर, अशोक गवळी, दिलीप गित्ते,  बाळासाहेब अहंकारे, भास्कर सिरसट, जिवन करवंदे, सिद्धेश्वर डोईफोडे, आघाव, शिंदे तसेच गृह रक्षक दलाच्या महिला कर्मचारी बंदोबस्तावर आहेत.                   
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने केज शहर हद्दीत देखील नगरपंचायतीच्या वतीने बिना मास्क फिरणाऱ्या लोकांवरती व गाड्या बिना मास्क घालून  फिरणाऱ्या लोकांवरती कडक कारवाई करण्यात येऊन दंड आकारला जात आहे.
close