shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फरार आरोपी केज पोलीसांच्या गुन्हे तपास पथकाच्या जाळ्यात..!!

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :- 
अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला व विवीध गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी केज पोलीसांच्या गुन्हे तपास पथकाने अटक करुन त्याला बेड्या ठोकल्या.


या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील पिंपळगाव येथील सुरेश उर्फ तायडया शिवराम शिंदे याच्या विरुद्ध केज पोलीस स्टेशनला संघटित चोरी व विविध गंभीर गुन्हे दाखल होते. परंतु सुरेश उर्फ तायडया गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. 


दरम्यान दि ८ मार्च रोजी सुरेश उर्फ तायडया हा केज येथे आला असल्याची माहिती गुन्हे तपास पथकाला एका गुप्त खबऱ्या मार्फत मिळाली. त्या नुसार केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप गित्ते व त्यांचे सहकारी बाळासाहेब अहंकारे, महादेव बहिरवाळ यांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले.

केज पोलिसांचे गुन्हे तपास पथक स्थापन झाल्या पासून फरारी व सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
close