पुणे । प्रतिनिधी :पुणे येथील देशभक्तकोशकार , गोसेवक चंद्रकांत शहासने यांना महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचे शुभहस्ते दिनांक ८ मार्च रोजी राष्ट्रीय सेवा सन्मानाने राजभवनात गौरविण्यात आले.
पुणे येथील श्री चंद्रकांत शहासने हे संत वाड्मयाचे विज्ञाननिष्ठ निरुपणकार असून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अभ्यासक आहेत.
दहा हजार क्रांतिकारकांची माहिती देणाऱ्या देशभक्तकोशाचे ते संकलक असून गोविज्ञानाचे जाणकारही आहेत. निसर्गोपचाराच्या माध्यमातून औषधाशिवाय रोगमुक्ती या विषयावर ते स्वतः संशोधन करीत असून अनेक असाध्य रोगांवर त्यांनी यशस्वी उपचारही केलेले आहेत.
मुक्काम वेळे जिल्हा सातारा येथील करूणा मंदिर गोशाळेत त्यांचे गोमूत्रावर संशोधन चालू आहे. गाय हा उपयुक्त पशू आहे या संकल्पनेच्या प्रचारासाठी ते अनेकप्रकारचे निसर्गोपचाराचे विविध प्रयोग करत असतात.
श्री चंद्रकांत शहासने यांनी निसर्गोपचाराची स्वतः ची शहासने योगोपचार पद्धतीही विकसित केलेली आहे.
श्री चंद्रकांत शहासने यांच्या गेल्या पंधरा वर्षांपासून चालू असलेल्या प्राकृतिक चिकित्सा, निसर्गोपचार तसेच गोविज्ञान संशोधन कार्याची दखल घेऊन मुंबईच्या गोरक्षक सेवा ट्रस्टच्या विद्यमाने या राष्ट्रीय सेवा सन्मान कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

