shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श पत्रकार समितीच्या वतीने महिलांचा सत्कार..!!



सफाई कर्मचारी, महिला पोलीस, महिला वाहक आणि सेवाभावी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा केला सत्कार..!! 

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :- 
जागतिक महिला दिनाच्या निमित्त आदर्श पत्रकार समितीच्या वतीने केज शहर आणि तालुक्यातील विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना संसर्गाच्या काळातही भल्या पहाटे ज्यांनी शहरातील सार्वजनिक रस्ते साफ सफाई करतात. अशा आमच्या भगिनींना आम्ही त्यांना कामात वापरण्यासाठी स्कार्फ देऊन आम्ही त्यांचा सत्कार केला. तसेच आम्ही प्रसंगानुरूप विविध सामाजिक उपक्रम देखील राबविले आहेत.
--- अशोक सोनवणे,
अध्यक्ष, आदर्श पत्रकार समिती


८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त केज तालुका आणि शहरातील विविध क्षेत्रात समर्थपणे काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केज तालुका आदर्श पत्रकार समितीच्या वतीने केला जातो. 

आज केज येथील नगर पंचायतीच्या स्वच्छता विभागातील सफाई काम करणाऱ्या भगिनींचा गुलाब पुष्प सत्कार आणि स्कार्फ देऊन सत्कार केला. तसेच सामाजीक क्षेत्रात नवचेतनाच्या माध्यमातून स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करीत असलेल्या सिताताई बनसोड, मनिषाताई घुले, विजयाताई कांबळे, ज्योती सांबरे, सारिका सिरसट, पिंकी डाके, याच्यासह पोलीस कर्मचारी रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे छाया घोशीर, जाधव मॅडम, वाहतूक नियंत्रक गुंड मॅडम, महिला वाहक यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार केला या प्रसंगी आदर्श पत्रकार समितीचे मार्गदर्शक प्रा. हनुमंत भोसले, शिवदास मुंडे, विजयराज आरकडे, धनंजय कुलकर्णी, धनंजय देशमुख आणि नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक सोनवणे, सचिव गौतम बचुटे, कार्याध्यक्षा सौ. रत्नमालाताई मुंडे, अनंत जाधव,
प्रविण देशमुख सर, प्रकाश मुंडे, जय जोगदंड, बाळासाहेब जाधव, महादेव काळे, धनंजय घोळवे, अक्षय बनसोडे, अक्षय वरपे आदी सर्व पत्रकार बांधव उपस्थिती होते.


close