shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे परीसरात पटारे वस्तीनजीक न्यु राजस्थान हरियाणा ढाब्याजवळ जलवाहिनी फुटल्याने उसाच्या पिकाचे नुकसान..!!



देहरे । प्रतिनिधी (निरज जेठे):  सकाळी ९ ते १ दरम्यान मुळा धरणांवरून एम आय डी सी कडे जाणारी मोठी जलवाहिनी फुटल्याने शेतातील उसाच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळी १०.००ते १.०० वाजे दरम्यान जलवाहिनी फुटल्याने उच्च दाबाच्या पाण्यामुळे शेतातील उभ्या उसाच्या पिकाचे या ठिकाणी नुकसान झाले आहे. 

जलवाहिनी फुटल्यावर तेथील शेतकरी  व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी एम आय डी सी मध्ये देखभाल व दुरुस्ती कार्यालय असलेल्या कार्यालयात सदर माहिती देण्यात आली. तेव्हा मुळा धरणावरून जलवाहिनी बंद करण्यात आली. त्यानंतर दिवसभरात जलवाहिनी चे दुरुस्ती चे काम सुरु होते. उद्या मंगळवारी सकाळी जलवाहिनी सुरू होईल असे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
close