shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील१२८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे आँनलाईन पद्धतीने उद्घाटन संपन्न ..!!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खासदार  सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील१२८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे आँनलाईन पद्धतीने उद्घाटन संपन्न ..!!


इंदापूर प्रतिनिधी:.इंदापूर तालुक्यातील१२८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खासदार  सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आँनलाईन पद्धतीने संपन्न झाला.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,युवकाध्यक्ष शुभम निंबाळकर, महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 
यावेळी निमगांव केतकी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत असताना म्हणाले की,
इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली.   आदरणीय शरद पवार यांनी उपस्थिती लावल्याने आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काम करण्याचे बळ अधिक वाढले आहे. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झालेली कामे पुढील तीन ते चार महिन्यात तडीस जाणार असून यामुळे दळणवळणाचा मार्ग सुखर होणार आहे. या कामावर जनतेने नजर ठेवून सर्व कामे दर्जेदार कशी होतील याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्य सरकारमध्ये घरचा वाढपी असल्याने इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी चिंता करू नये असे म्हणत थोड्या दिवसात १६० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे  पुढे म्हणाले की ,कुणाला नावे ठेवून कोण मोठा होत नसतो. त्यामुळे विरोधकांनी तालुक्याचे विकासात राजकारण करू नये. बावडा ग्रामीण रूग्णालय व भिगवण ट्रामा सेंटर २०१२ साली मंजूर झाले. मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा या २०१४ मध्ये मी आमदार झाल्यानंतर देण्यात आल्या. एखाद्याने जुने काम केले म्हणजे त्याच्यावर कायमस्वरूपी आपलेच नाव लावावे असे नसते. बावडा रुग्णालयाचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यासाठी मी स्वतः शिफारस पत्र दिले असून तुम्हाला वेळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन खात्री करा व माहीती घ्यावी.
एखाद्या पेपरमध्ये फोटो छापला  म्हणजे इंदापूरची जनता साथ देते असे होत नाही, इंदापूरची जनता प्रामाणिक माणसाला साथ देते आणि जनतेने तुम्हाला घरी बसण्याचा सल्ला दिला आहे तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात अनुभवाने ही दांडगे आहात त्यामुळे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत व आमचं कुठे चुकले तर आम्हाला सल्ला द्यावा तो सल्ला मी प्रेमाने स्विकारीन मात्र राजकारणासाठी आडकाठी घालून आरोप करु नयेत असे  

याप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की,महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभरात विकासाची कामे चालू असून इंदापूर तालुक्यात ही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सर्वाधिक कामे चालू आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्वाधिक लक्ष इंदापूर तालुक्यावर असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सतत मंत्रालयात इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी पाठपुरावा करत असतात. राज्यमंत्री भरणे यांची कार्यक्षम मंत्री म्हणून राज्यभरात ओळख आहे. एमआयडीसी मधील उद्योगधंदे टिकून आहेत.त्यामुळे भविष्यातही इंदापूर एमआयडीसी मध्ये बंदी आणण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन सुळे यांनी दिले.

सूत्रसंचालन संतोष गदादे यांनी केले.आभार तात्यासाहेब वडापूरे यांनी मानले.
close