shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटीलांनी जागवल्या ३५ वर्षापूर्वींच्या आठवणी !

हर्षवर्धन पाटीलांनी जागवल्या ३५ वर्षापूर्वींच्या  आठवणी !
फोटो :- हर्षवर्धन पाटील यांनी गणेशवाडी व पिंपरी बुद्रुक येथे जुन्या पिढीतील मार्गदर्शकांची सदिच्छा भेट घेतली.

 - जुन्या पिढीतील मार्गदर्शकांची घेतली भेट 
इंदापूर:प्रतिनिधी( दि.२७ मार्च २१)
               माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शनिवारी (दि. २७ ) सुमारे ३५ वर्षापूर्वीच्या आठवणीत रमून गेले, निमित्तही तसेच होते. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी व पिंपरी बु. येथे जुन्या पिढीतील ज्येष्ठ मार्गदर्शकांची घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली व जुन्या आठवणींच्या गप्पांमध्ये सर्वजण रमून गेले.
                 सन १९९० चा काळ होता. लोकनेते शहाजीराव पाटील यांचे पुत्र व कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील या युवा नेत्यास इंदापूर तालुक्यातील जुन्या पिढीतील अनेकांनी साथ दिली, प्रेम दिले. या सर्वांचे सहकार्य व हर्षवर्धन पाटील यांच्या अंगी असलेली जिद्द, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर हे राज्यपातळीवरील नेतृत्व तयार झाले .
                जुन्या पिढीतील जेष्ठ मार्गदर्शक मारुतीभाऊ घोगरे यांची हर्षवर्धन पाटील यांनी गणेशवाडी येथे भेट घेतली. मारुतीभाऊ आज १०५ वर्षाचे आहेत. या वयातही त्यांची तब्येत उत्तम आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या सामाजिक, राजकीय प्रवासाचे मारुतीभाऊ खंदे समर्थक आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या कात्रज जिल्हा दुध संघाचे संचालक, अकलूज कारखान्याचे संचालक, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार या राजकीय प्रवासामध्ये मारुतीभाऊ यांची मोलाची साथ व मार्गदर्शन मिळाले, हे नाते आजही कायम आहे. या भेटीत गप्पांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी अनेक जुने किस्से सांगताना हास्याचे फवारे उडाले.
              तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी दुसरे जुन्या पिढीतील मार्गदर्शक पांडुरंगनाना बोडके (पिंपरी बु.) यांची सदिच्छा भेट घेतली. पांडुरंगनाना  वय वर्षे ७५ च्या घरात आहेस. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत हर्षवर्धन पाटील यांनी जुन्या घटनांना उजाळा देत गप्पा मारल्या.
        दरम्यान, मारुतीभाऊ घोगरे, पांडुरंगनाना  बोडके अशा अनेक ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या निस्वार्थी सहकार्यामुळे मी घडलो, त्यांच्या भेटीतून नवी ऊर्जा प्राप्त होते, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
_______________________________

close