भिगवण येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय व शिवसेना शाखेचे उद्घाटन संपन्न..!!
इंदापूर प्रतिनिधी: (दि.२७ मार्च २१) इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय व शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राजेंद्रजी काळे साहेब यांच्या शुभहस्ते व तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी जिल्हा समन्वयक विशालदादा बोंद्रे, जिल्हा समन्वयक भीमरावआप्पा भोसले, उपजिल्हाप्रमुख संजूभाऊ काळे, इंदापुर शहरप्रमुख महादेव सोमवंशी, माजी तालुकाप्रमुख योगेशकाका कणसे, माजी तालुकाप्रमुख ॲड नितीन कदम, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समन्वयक अरुण पवार, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका शारदाताई सोनवणे, माथाडी कामगार संघटनेचे दुर्वास शेवाळे,राजु शेवाळे ,उपतालुकाप्रमुख आप्पासाहेब डोंगरे, भिगवण गटाचे उपतालुकाप्रमुख फिरोज पठाण, विभागप्रमुख अंकुश गलांडे, हेमंत भोसले, अमित बामणे,राजे भोसले, बंडू शेवाळे, बालाजी पाटिल यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन भिगवण शाखाप्रमुख रामचंद्र पाचंगणे, उपशाखाप्रमुख मोबिन मतिसे यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी प्रास्तविक केले, तर जिल्हाप्रमुख ॲड राजेंद्रजी काळे, विशालदादा बोंद्रे, भीमरावआप्पा भोसले, संजूभाऊ काळे यांनी मार्गदर्शन केले.

