shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केजच्या डॉ.अंजलीताई घाडगे यांच्या कस्तुरी या हिंदी बाल चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर..!!

प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:-                      बीड जिल्ह्यातील केजची कन्या तथा शिवसेनेच्या नेत्या डॉ. अंजलीताई घाडगे यांनी कस्तुरी या हिंदी बालचित्रपटाची निर्मिती २०१९ केली होती.नुकतीच ६७ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली असुन यामध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट म्हणून कस्तुरी हिंदी चित्रपटाला पुरस्कार मिळाला असल्याने डॉ.अंजलीताई घाडगे यांच सर्वत्र   अभिनंदन करून कौतुक केले जात आहे. 

महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्हा हा ऊसतोड मजूरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पण याच बीड जिल्ह्यात चित्रपट क्षेत्रात नाव उज्वल करणारे निर्माते देखील असल्याचे केज येथील नालंदा विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामराव घाडगे गुरुजी व केजच्या सेवानिवृत्त नायबतहसीलदार शारदाताई घाडगे यांची कन्या व शिवसेनेच्या नेत्या डॉ.अंजलीताई घाडगे यांनी निर्मिती केलेल्या कस्तुरी या हिंदी बाल चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दाखवून दिले आहे. डॉ. अंजलीताई घाडगे यांनी २०१९ मध्ये कस्तुरी या हिंदी बाल चित्रपटाची निर्मिती केली होती. 

नुकतीच ६७ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली असुन यामध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट म्हणून कस्तुरी या हिंदी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद कांबळे यांनी केले आहे. बाल कलाकार म्हणून समर्थ सोनवणे, श्रावण उपलक, वैशाली केंढले, विनोद कुलकर्णी, कुणाल पवार, अजय चव्हाण, राजू परदेशी, आकाश बनसोडे, विजय शिकरे, समाधान सरगोध्ये यांनी भूमिका केली आहे. 

नऊ महिलांनी मिळून हा चित्रपट बनवला आहे.      राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल  निर्मात्या डॉ.अंजलीताई घाडगे व त्यांच्या सर्व  टीमचे बीड जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
close