कोपरगाव नगरपालिका मध्ये भाजपा च्या नगरसेवकांनी २७ विकास कामांना विरोध केला.. नगराध्यक्ष व इतर नगरसेवक कलम ३०८ खाली जिल्हाधिकारी यांचेकडे अपिलात गेले व कामे मंजूर करून घेतले.
सन २०१५ मध्ये नगरपालिका मध्ये भाजपा राष्ट्रवादीची सहमती एक्सप्रेस ची सत्ता होती.. गावात पालखी रस्त्याचे काम चालू होते.. दोन भाजपाच्या नगरसेवकांनी रस्त्याचे कामे निकृष्ट व्हावेत म्हणून भर चौकात शिवीगाळ केली.. माझ्यावर राजकीय दबावात सरकारी कामात अडथळा खोटी केस दाखल झाली.. रस्त्याचे काम इतके उत्कृष्ट झाले की ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करावी लागली.
नगरपालिका निवडणूकांच्या तोंडावर बँक रोड, गुरूद्वारा रोड, एस जी विद्यालय रोड,इंदीरा पथ, साई कॉर्नर रस्ता, आचारी हॉस्पीटल रोड सहमती एक्सप्रेसने इतके निकृष्ट केले की नंतरच् पाच वर्षे नागरीक ह्या रस्त्यावरून प्रवास करताना नरक यातना भेगतात.
नागरीकांनी वैतागून नगरपालिका निवडणूकीत ना खाऊंगी ना खाणे दुंगा निवडून दिला.. त्यांच्या काळात पुन्हा आचारी हॉस्पीटल रोड झाला तीन महीन्यात उखडला.. पोलीस स्टेशन जवळ रस्त्याला तडे गेले.. अग्रवाल चहा भांडार जवळचा रस्ता होत्याचा नव्हता झाला.. शिंदे शिंगी नगर मध्ये रस्यावर डांबरच नाही.. खडकीतील रस्ता सहा महीन्यात उखडला.. किती उदाहरणे द्यावीत.
एकूण काय २७ कामांना मंजूरी म्हणजे अधिकाऱ्यांचे , ठेकेदारांचे व पदाधिकारी यांचे वाटे निश्चित झाले कोणत्याही पक्षाचे असोत.. माझ्यामुळेच कामे झालीत हे सांगून जनतेला वेड्यात काढून मते मागणार.. ! एकूण अनुभव असा की कामे मंजूर करताना दाखवायला असहमती व कामे करताना सहमती एक्सप्रेस धावते.
जनतेला कधी काम सूरू करताना कामाच्या स्वरूपाचे फलक दिसले का? मग ती सहमतीची सत्ता असो की ना खाऊंगा ना खाणे दुंगाची.. जनतेने हूरळून जाण्याचे कारण नाही.. कामे उत्कृष्ट झाले नाही तर ना खाऊंगा ना खाणे दुंगा सारखा प्रत्येक प्रभागात निवडण्याची तयारी ठेवा.
लेखन
संजय भास्करराव काळे
कोपरगाव.

