shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरेगावातील अनधिकृत जागेवर चालू असलेले देशी दारू दुकान बंद करण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱी यांना तक्रार...!

सुरेगाव प्रतिनिधी-विशाल लोंढे...!!
सुरेगावतील अनधिकृत जागेवर चालू असलेले देशी दारू दुकान बंद करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांचे कडे विशाल जाधव यांचा तक्रार अर्ज दाखल.
जिल्हाधिकारी अहमदनगर यांना पाठवलेल्या तक्रार अर्जात विशाल जाधव यांनी सांगितले आहे की सुरेगावतील सी एल ३ परवाना क्र.४८
अनधिकृत जागेवर अकृषक परवानगी नसताना चालू असल्याने सदर परवान्यांचे नुतिनिकरन करण्यात येऊ नये अशी मागणी विशाल जाधव यांनी जिल्हाधिकारी; उत्पादन शुल्क विभाग यांचे कडे पत्राद्वारे केली आहे. 

तक्रार अर्जात जाधव यांनी म्हटले आहे की आस्थापना परवाना धारक श्रीमती प्रमिला जॉन जाधव क्र.४८ सी एल ३ ची मंजुरी ही सर्वे नं. ११० मध्ये असताना तो सर्वे न १११ मधील घर न ३९३ मध्ये  अनाधिकाराने उत्पादन शुल्क विभाग यांची परवानगी न घेता नियम बाह्य स्थलांतर केलेला आहे या विरोधात माझे वडील अनिल जाधव यांनी २०१४ मध्ये तक्रार दाखल केलेली आहे दिवाणी दाव्यात माजी अधीक्षक पी एम नवलकर राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांनी सदर परवाना हा सर्वे न ११० मध्येच चालू असल्याची साक्ष कोर्टात दिलेली आहे राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभाग यांनी तीन जुलै २०१४ मध्ये नोंदवहीत नियम भंग नोंदवलेला आहे परवाना स्थलांतर करण्याकरिता नियम २५ प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे कडे अर्ज सादर केलेला नाही.

त्यासाठी ग्रामसभा ठराव प्रत, नाहरकत प्रमाणपत्र ,अकृषक प्रमाणपत्र कायदा व सुव्यवस्थे बाबत पोलीस विभागाचे प्रमाणपत्र आदी कागद पत्रे दाखल करावी लागतात सदर अनुण्यप्ती धारकाने मुबंई दारूबंदी नियम १९५४ अंतर्गत नियम चार प्रमाणे स्थलांतर शुल्क अदा केलेले नाही महाराष्ट्र देशी दारूचे नियम,१९७३ नियम २५ प्रमाणे सदर परवाना स्थलांतरित झालेला नसताना आत्ता पर्यंत अनुण्यप्ती धारकाने शासनाची मोठी फसवणूक केलेली असल्याने सदर परवाना तात्काळ रद्द करण्यात येऊन या नियम बाह्य परवान्यांचे पुढील नुतिनिकरन थांबवणाची मागणी जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या तक्रार अर्जात केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
close