shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्री शेत्र खांडेश्वर महाशिवरात्र यात्रा उत्सव रद्द...!!

संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):
संगमनेर तालुक्यातील शिवभक्तांचे देवस्थान श्री खांडेश्वर मंदिर या ठिकाणी या वर्षी कोरना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

देवस्थानचे अध्यक्ष ,श्री लहानु भाऊ गुंजाळ 
व खांडेश्वर ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे कोरोना मुळे श्री खंडेश्वर देवस्थान बंद राहील वभाविकांनी मंदिराच्या परिसरात गर्दी करू नये अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती श्रीखांडेश्वर  देवस्थानचे अध्यक्ष लहानु भाऊ गुंजाळ यांनी दिली .
याच प्रमाणे यावर्षीची  शिवभक्तांनी महाशिवरात्र आपापल्या घरीच साजरा करावी अशी विनंती लहानु भाऊ गुंजाळ यांनी केली आहे.
close