पिंपरी चिंचवड:-नियोजित वधू अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्याशी विवाह केला. याबाबत विवाह करणारा तरुण, त्याचे वडील आणि आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2 ऑक्टोबर 2019 रोजी काळेवाडी येथे घडला.
मुलगा इसकपांडी, वडील शंकर मुथ्थू, आई मंगेश्वरी (सर्व रा. मिडल स्ट्रीट, केला थेरू, कोविलम्म पुरम, तामिळनाडू) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इसकपांडी याचा विवाह लावून दिला. त्यानंतर मुलगी नऊ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत नानगुरी, तामिळनाडू येथे एडब्लूपीएस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिथून हा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.

