shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तालुक्याच्या सिंचनासाठीच्या भरीव निधीचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा.

तालुक्याच्या सिंचनासाठीच्या भरीव निधीचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच इंदापूर तालुक्‍यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली. याचे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून, फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंत आरडे, तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे, विष्णू पाटील, धनाजी देवकाते, अक्षय कोकाटे, एकनाथ गार्डी, रमेश पाटील, उमेश शिंदे, सुरेश शिंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे म्हणाले,  नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये इंदापूर तालुक्याकरिता भरीव निधीची तरतूद करण्यात आली.याबद्दल सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानतो. अर्थसंकल्पामध्ये केलेल्या या भरीव निधींच्या तरतुदीमुळे तालुक्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या लाकडी-निंबोडी सिंचन योजनेला गती मिळणार आहे. यांसह खोरोचीच्या मोठ्या बॅरेजचे काम बोराटवाडी येथे मोठ्या पुलाचे काम, निरा नरसिंहपूर साठी १०१ कोटींचा निधींची तरतूद करण्यात आली आहे. यातून निरा नदीवरील बंधाऱ्याची दुरुस्ती, भिमा नदीवर भिगवण, पळसदेव येथे दोन बुडीत बंधारे आदी कामांकरिता शेकडो कोटींचा निधी तालुक्यास उपलब्ध झाल्याने प्रलंबित कामे मार्गी लागणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत आरडे म्हणाले, इंदापूर तालुक्‍याच्या राजकारणात गेल्या २५ वर्षांपासून चर्चिला जात असलेल्या लाकडी-निंबोडी सिंचन योजनेसाठी अर्थमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात तरतूद करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तसेच या योजनेसाठी तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेला पाठपुरावा कामी आला. या योजनेमुळे साडेचार हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे आरडे म्हणाले.

====================================
close