पिंपरी चिंचवड:-सामाजिक सुरक्षा पथकातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे पोलीस वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सप्टेंबर महिन्यात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची पिंपरी चिंचवड पोलीस दलात सुरुवात केली. शहरातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करणे, हा या पथकाच्या स्थापनेमागील उद्देश होता.
सामाजिक सुरक्षा पथकाकडून दररोज अवैध धंद्यांवर कारवाई देखील केली जात आहे. या पथकाला बळ देता देता अचानक या पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बदली केलेल्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात सामाजिक सुरक्षा पथकात नेमणूक केली होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ कर्तव्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
बदली झालेले कर्मचारी (बदलीचे ठिकाण)
पोलीस हवालदार संदीप गवारी (भोसरी)
पोलीस नाईक दीपक साबळे (भोसरी)
पोलीस हवालदार अनंत यादव (दिघी आळंदी वाहतूक विभाग),पोलीस हवालदार संतोष अस्वले (गुन्हे शाखा युनिट चार),पोलीस नाईक महेश बारकुले (तळेगाव दाभाडे),पोलीस नाईक विष्णू भारती (पिंपरी)
पोलीस शिपाई मारोतराव जाधव (चाकण वाहतूक विभाग).

