shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महावितरणने तत्काळ वीज तोडणी थांबवावी.. हर्षवर्धन पाटील..!!

 महावितरणने तत्काळ वीज तोडणी थांबवावी.. हर्षवर्धन पाटील..!!


इंदापूर प्रतिनिधी:शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असताना आज सगळीकडे मोठ्या प्रमाणात वीज तोडण्याचे काम अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे त्याला त्वरित स्थगिती मिळावी अशी मागणी माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की एका बाजूला उपमुख्यमंत्री सभाग्रह सांगतात वीज बिल कनेक्शन तोडणी केली जाणार नाही, स्थगिती दिली आहे. अधिवेशन संपताच ऊर्जामंत्री म्हणतात की वीज बिलांची वसुली सुरू राहील. ही शेतकऱ्यांची फसवणूक असून हुकूमशाही आहे.मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात अन्याय करत आहे त्याचा सर्वप्रथम निषेध करतो. सरकार, महावितरण व मंत्रिमंडळातील सहकाऱ्याला आवाहन राहील तुम्ही अशा परिस्थितीत वीज बिल वसुली करू नये.

गेले वर्ष शेतकऱ्यांचे वाईट गेले असून उद्योगधंदे बंद पडले आहेत शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सध्या शेतात उसाचे, मक्याचे पीक जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे त्यामुळे तत्काळ वीज तोडणी थांबवावी गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत जनावरांना प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीत वीज तोडणी ला स्थगिती देऊन उन्हाळा संपेपर्यंत कोणत्याही प्रकारची वसुली करू नये अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

नंतर च्या काळात शेतकऱ्यांकडे वीजबिल वसुली हप्त्याने वसूल करावेत या वेळी शेतकरी नक्कीच सहकार्य करतील शेतकऱ्यांवर अन्याय करणार असाल तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
close