खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील १२८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन व उद्घाटन (दि.२७) रोजी होणार संपन्न .
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील १२८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद गटामध्ये ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर सोनाई उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणारी कामे व आमदार फंड खासदार फंड जिल्हा नियोजन समिती.२५-१५ व दलित वस्ती योजनेअंतर्गत तालुका वर सुचविलेल्या ८ कोटी ५२ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी सर्व जिल्हा परिषद सदस्य. पंचायत समिती सदस्य. विविध संस्थांचे पदाधिकारी. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व महा विकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिली आहे.
*भूमिपूजन व उद्घाटन होणारी कामे खालील प्रमाणे*
सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत होणारी कामे
वडापुरी ते काटी रस्ता २ कोटी ८१ लाख. पिंपरी बुद्रुक ते शिरसोडी इंदापूर रस्ता ४ कोटी २४ लाख. निमगाव केतकी ते सराफवाडी रस्ता ३ कोटी १५ लाख. पिठेवाडी ते सराटी रस्ता १ कोटी ८९ लाख.राजवडी ते कर्मयोगी साखर कारखाना रस्ता १ कोटी ७५ लाख. कर्मयोगी साखर कारखाना ते निमगाव केतकी ३ कोटी. लोणी देवकर ते वरकुटे खुर्द रस्ता २ कोटी ५० लाख.नीरा भीमा कारखाना ते वकील वस्ती १ कोटी ९५ लाख. कळस ते न्हावी रस्ता ७ कोटी. कर्मयोगी कारखाना ते तरंगवाडी रस्ता २ कोटी ९५ लाख. राष्ट्रीय महामार्ग ६५ ते बाभूळगाव भाटनिमगाव रस्ता ३ कोटी.इंदापूर ते अवसरी भांडगाव रस्ता ५ कोटी. इंदापूर खुळे चौक ते शासकीय विश्रामगृह इंदापूर रस्ता २ कोटी ५० लाख. निमगाव केतकी ते लोणी देवकर रस्ता ८ कोटी. सोनाई गुळ कारखाना ते अगोती नंबर एक रस्ता ४ कोटी २५ लाख.वरकुटे बुद्रुक ते वायरलेस व कळाशी गंगावळण रस्ता ३ कोटी ५० लाख. सपकळवाडी ते संजयनगर रस्ता १ कोटी ८ लाख. राष्ट्रीय महामार्ग ९ ते कचरेवाडी धुमाळ वस्ती रस्ता १ कोटी ८९ लाख. वालचंदनगर ते जमदाडे वस्ती रस्ता १ कोटी १८ लाख. शेटफळगडे ते वाबळे वस्ती राजपुरे वस्ती महानवर वस्ती रस्ता १ कोटी ७८ लाख. निरगुडे लकडे वस्ती २ कोटी ७१ लाख. खराओढा ते वाघमोडे वस्ती बोरी १ कोटी ८४ लाख. चिंदादेवी ते पडस्थळ रस्ता २ कोटी २७ लाख.माळेवाडी भावडी ते राऊत दरेकर वस्ती रस्ता ३ कोटी ५० लाख.
इंदापूर येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम १ कोटी ६४ लाख. इंदापूर येथे नवीन प्रशासकीय भवन अभिलेख कक्ष सेतू व उपार ग्रहाचे बांधकाम ३ कोटी ७७ लाख. तरंगवाडी येथे धान्य गोदामासाठी आवारभिंत व अंतर्गत कॉंक्रीट रस्ते १ कोटी ७७ लाख. निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन ज कक्ष व अनुषंगिक कामे ६६ लाख. श्री नरसिंह पूर येथे बसस्थानकाची इमारत बांधणे २ कोटी १२लाख. हॉटेल आनंद ते मदनवाडी पॉधवाडी रस्ता ३ कोटी ६७ लाख. सिनारमास कंपनी ते अकोले रस्ता ३ कोटी २० लाख.काझड ते अकोले रस्त्यावरील नीरा डावा कालवा वर पुल बांधने १ कोटी. ३९ फाटा ते काझड रोडवरील नीरा डावा कालव्या वरिल पूल बांधणे २ कोटी. ३९फाटा ते बोरी ते सुपारवाडी रस्ता ५ कोटी. अंथरणे भरणेवाडी रस्ता ६ कोटी. अकोले ते कळस रस्ता १ कोटी २७ लाख. डिकसळ ते जोगेश्वरी लिफ्ट रस्ता १ कोटी ५३ लाख. पोध्दवडी ते कुंभारगाव रस्ता ८ कोटी ६६ लाख. शेळगाव येथील नीरा डावा कालवा वरील पूल बांधणे १ कोटी. जंक्शन ते बोरी पाटी रस्ता २ कोटी ८० लाख.
ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या कार्यक्रमाची ठिकाणे:
सणसर-लासुणे
सपकळवाडी
कळस- वालचंदनगर
कळंब
निमगाव केतकी- निमसाखर निमगाव केतकी
पळसदेव बिजवडी
शिरसोडी
काटी -वडापुरी
वडापुरी
बावडा- लाखेवाडी
सराटी
भिगवण- शेटफळगडे मदनवाडी
इंदापूर शहर
प्रशासकीय भवन इंदापूर

