shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर सोलापूर रस्त्यावर खड्ड्यांमुळे दोन वाहनांत अपघात...!!

रुईछत्तीसी । प्रतिनिधी:
नगर‌ करमाळा सोलापूर रस्त्यावरुन परराज्यातुन  मोठ्या प्रमाणावर खुप जड वाहनांची वाहतूक ‌होत असते.आज दहिगाव हद्दीत ‌दि: २५ सकाळी  खड्डे चुकवयाच्या नादात टिएन ५२ एम -५३६८ मालवाहतूक ट्रक आणि दुसर्या अज्ञात वाहनात अपघात घडला यात चालक व किनीर किरकोळ जखमी झाले. सदर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. एक वाहन घटनास्थळावरून  पसार झाले. 

नगर सोलापूर रस्त्यावर दररोज अनेक खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत. घटना स्थळी उशीरा पर्यंत पोलिस पोहचले नव्हते. यात अनेकांचे जीव हि गेले आहे आणि जात हि आहेत. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या बाबत नेहमी दै.पुढारीने या रस्त्या बाबतीच्या समस्या जनतेसमोर मांडल्या आहेत. सध्या हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६ अ मध्ये वर्ग झालेला आहे.

पण देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग नगर विभाग यांच्या कडे आहे.पण या रस्त्यावर खड्डे बुजवण्यात काम पुर्ण होत आले तसे मागे खड्डे पडत गेले.लाखो रूपये खर्च करून हि आज नगर- सोलापूर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पुन्हा जैसे थे वैसे झाले आहे. या रस्त्याचे भुसंपादन प्रकिया पुर्ण होत आली आहे असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय कडुन कळवले जाते आहे.या रस्त्यावर नागरिकांना दररोज खड्डेमय रस्त्यावर प्रवास करणच नशीबात आहे.
close