*कानुन के हाथ लंबे होते है हे अहमदनगर पोलिसांनी दाखवुन दिले...!
*नगर पोलीसाची कामगिरी उल्लेखनीय पण....!!
नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):-
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून वाद घालुन जातेगाव घाटात तिक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
महेश तनपुरे
पोलिसांनी आता पर्यंत दहा आरोपी जेरबंद केले आहेत. यातील मुख्य आरोपी तिन महिन्या पासून फरार होता. आरोपी नामे बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे मुळ गाव नगर तालुक्यातील वाळकी हल्ली मुक्काम बालिका आश्रम रोड,नगर याला पोलिसांनी हैदराबादच्या बिल्लानगर या गजबजलेल्या भागातील हाँटेलमधील खोली क्रमांक १०९ मध्ये शिरून अटक केली आहे. त्या खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. कुलुप या साठी की या ठिकाणी कोणी राहत नाही.या खोलीला मागच्या बाजूला दुसरा एक दरवाजा होता.
असे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज त्याला पारनेर पोलिस स्टेशनला आणले गेले आहे.पण इतर आरोपी प्रमाणे बाळ बोठे व मदत करणारा अंतुले वकील यांना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत आहे.जसे इतर आरोपी प्रमाणे दुजा भाव केला जात आहे.हे उपस्थित नागरिकांनी पाहिले .
आणि हे फोटो वरून स्पष्ट दिसत आहे.ज्या प्रमाणे कायदा सर्वाना समान आहे.तसा बोठे यास तो अपवाद ठरला आहे.उद्या पारनेर च्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.आता पर्यंत पोलिसांना महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.या आधी सुपारी कामी दिलेली रक्कम सहा लाख वीस हजार रुपये हस्तगत केले गेले आहे.हत्या मागचं मुख्य कारण माझी बदनामी होईल, गंभीर गुन्हे दाखल ह़ोतील या भिंती पोटी हत्या केली गेली अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. आरोपीला पकडण्यासाठी हैद्राबाद चे पोलिस कमिशनर भागवत , साह्याक पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल,अनिल कटके ,पिआय यादव,पिआय गायकवाड, गडकरी मॅडम,एपिआय पाटील, एपिआय सानप , मुंबई सायबर पोलीस , मुंबई जाॅईन कमिशन , सोलापूर सायबर पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांनी खुप मोलाची साथ दिली या साठी सहा पथके कामगीरी करत होते गेले पाचव्या दिवशी आरोपी बाळं बोठे हाताला लागला. आरोपी पत्रकारिता क्षेत्रातील क्राईम रिपोर्टर म्हणून कामा केले होते.तसेच पोलिस अधिकारी कर्मचारी संबंध असल्याने तपासाची गोपनीयता बोठेला माहिती पडत होती आणि तसं आढळल्या मुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी फिल्म स्टोरी प्रमाणे रचना करून गोपनीयता धोरण पाळुन या गुन्ह्यातील आऱोपीस अटक करण्यात यश आले. यात हॅनी ट्रप चा किती संबंध आहे हे या हत्या कांडात येत आहे का पाहणे गरजेचे आहे.हॅनी ट्रप मध्ये कोटीचे कोटी उलाढाल झाली आहे.मोठ मोठ्या माशांचा यांत नाव पुढं येतात कि काय हे हि पाहणे तितकं महत्त्वाचे आहे.
हॅनी ट्रप चे अँक्टर मामी,लैला,पंटर,राजा, असे अनेक कलाकार नावं आहेत पण यातील पात्रातील पात्र खर्या नावाने पुढे येणार का...?
बाळ बोठे ला अनेक जण मदत करतं होते हे काहि तपास स्पष्ट झाले आहे.यात प्रमुख मदत करणारे आंध्र प्रदेश मधील जनार्दन अंतुले वकील यांनी यांच्या बाकी चार साथीदार लपण्यासाठी मदत केली. या पुवीॅ गुन्ह्यात वापरलेला मोबाईल बोठे वापर होता.तो महेश वसंतराव तनपुरे यांच्या मोबाईल वरून आपल्या कुटुंबातील सदस्य बरोबर बोलत होता. हे तपासत समोर अल्याने या आधारे पोलिस बोठे पर्यंत पोहचण्यास मदत झाली हा तनपुरे अनेक दिवसांपासून बोठे यांचा पंटर म्हणून काम करत होता.
महेश तनपुरे याला मात्र पोलिसांनी बेड्या घालण्याची तसदी घेतल्याचे दिसून आले.ज्या वाहानातुन बोठे ला आणण्यात आला होता तो.त्या वाहानाला तिरंगा ध्वज दिसत आहे.मदत करणारे सहभागी
आरोपीचे नावे चंद्रापप्पा राजशेखर अजय चाकाली (वय-२५)रा.गुडुर करीम नगर,मुस्ताबाद आंध्र प्रदेश,शेख इस्माईल,शेख अली,(वय-३०)रा.बलापुर सरनगर, रंगारेड्डी आंध्र प्रदेश, अब्दुल रहमान आरीफ (वय-,५२) रा.चारमीनार मजिद रंगारेड्डी आंध्र प्रदेश, आणि एक फरार महिला आरोपी अनंत लक्ष्मी व्यंकटम हैद्राबाद.नगर मधुन महेश वसंतराव तनपुरे (वय -४०) रा.नवले नगर याला सकाळी अटक करण्यात आली.आज बोठेला पकडल्या नंतर सर्वत्र बातम्या ला महापुर आला अनेक उलगडेल बाहेर आले आजुन येणे बाकी आहे.आज सायंकाळी बोठे यांची पत्नी सविता बोठे ,मुले हषॅ ,यश, व बोठे नातेवाईक पारनेर पोलिस ठाण्याच्या आवारात आधीपासून उपस्थित होते. या वेळी बोठेच्या गळ्यात पडुन पत्नी रडत असताना पोलिसांनी दोघांना बाजूला केले.

