युवा क्रांती प्रतिष्ठाणचा १० वा वर्धापन दिनी १५३ बाटली रक्तदान संकलन तर २५ तरूणांनी प्लाझ्मा डोनेशन साठी सँम्पल दिले.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे (दि. ११ मार्च.२१) रोजी युवा क्रांती प्रतिष्ठान इंदापूर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन डाॕ.एम के इनामदार यांच्या हस्ते व इंदापुर नगरीच्या नगराध्यक्षा सौ. अंकिताताई शहा, योगेश मालखरे स्माईल प्लस सोशल फाँडेशन महाराष्ट्र व गिर्यारोहक अनिल वाघ, हाजी रज्जाकभाई पठाण आदर्श गोपालक व जेष्ठ नागरीक संघाचे दत्तात्रय गुजरसर च्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या रक्तदान शिबिरामधे युवा क्रांती प्रतिष्ठाणचा १० वा वर्धापन दिन व छत्रपती संभाजी राजांच्या बलिदान दिना निमित्ताने युवक मिञांनी व नागरिकांनी १५३ बाटली रक्तदान केले. व २५ तरूणांनी प्लाझ्मा डोनेशन साठी सँम्पल दिले. सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड सेंटर सोलापूर यांचेकडुन रक्तदान संकलित करण्यात आले.
यावेळी युवा क्रांती प्रतिष्ठानचे सन २०२१-२२ साठी नविन कार्यकारिणीतील पदाधिकारी यांची निवड संस्थापक-अध्यक्ष प्रशांतदादा शिताप व संस्थापक उपाध्यक्ष धरमचंदजी लोढा यांनी जाहिर केली. यामध्ये अध्यक्ष - दशरथदादा भोंग,उपाध्यक्ष - बाळासाहेब क्षिरसागर.महिला अध्यक्षा- -सौ.सायराभाभी आत्तार,महिला उपाध्यक्षा सौ.स्मिताताई पवार.युवा अध्यक्ष अशिष देवकर. युवाउपाध्यक्ष मनेष जाधव.
युवा क्रांती प्रतिष्ठान च्या वतीने इंदापूर शहरामध्ये सामाजिक कार्यक्रम वेगवेगळ्या माध्यमातून समाज हितासाठी राबविल्या जातात. यामध्ये समाजातील प्रत्येक घटक यांना वेगवेगळ्या माध्यमातून समाविष्ट करून त्यांना प्रोत्साहित केले जाते.( दि.११) रोजी छत्रपती संभाजीराजांच्या बलीदानाचा दिनानिमित्त युवा क्रांती प्रतिष्ठान वतीने १५३ बाटल्या रक्तदानातून संकलन करण्यात आले. तर २५ तरुणांनी प्लाजमा डोनेशन साठी सॅम्पल दिले. हा उपक्रम राबवून युवा क्रांती प्रतिष्ठानने वर्धापन दिनाचा एक आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमास अनेक सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थित राहून भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पियुष बोरा , अक्षय खरात, हमिदभाई अत्तार, मेजर महादेव सोमवंशी, मेजर रवीराज पवार, मेजर गवळी ऊपस्थित होते.

