shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे शहरात ह्रदय विकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू, पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाने पुढाकार घेत जबाबदारी पार पाडली..!!

पुणे:-पुण्याच्या समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेचा स्वच्छतागृहात हृदयविकाराचा झटका आल्याने दुर्देवी मृत्यू झाला. या महिलेचे कुणीही नातेवाईक नसल्यामुळे कुणीही समोर येण्यास तयार नव्हते. अशावेळी पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाने पुढाकार घेत जबाबदारी पार पाडली. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. 


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रुग्णालयातील स्वच्छतागृहात हृदयविकाराचा झटका आल्याने एक महिला खाली कोसळली असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर दामिनी पथकाच्या मार्शल श्वेता वलेकर आणि सुजाता व्हनहुने त्या ठिकाणी पोहोचल्या. यावेेेळी त्याांनी या महिलेला स्वछतागृहातून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केेले. यावेेळी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

दरम्यान मृत्यूनंतर या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु या महिलेचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे पुढील सोपस्कार पार पाडण्यासाठी कुणीही समोर येत नव्हते. अशावेळी दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि जबाबदारी पार पडली. दरम्यान कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे या महिलेच्या मृतदेहावर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
close