हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१३ मार्च शनिवार रोजी नांदेड येथील मारवाडी धर्मशाळा येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची हिंगोली व नांदेड जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष शंकर मावलगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीमध्ये प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली समितीची संघटनात्मक बांधणी व विस्तार व्यापक करण्यासाठी व तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली व पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणी व समितीचा विस्तार जास्तीत जास्त करण्यासाठी आपआपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी मान्यवर प्रदेश उपाध्यक्ष रामगिरे पाटील,प्रदेशउपाध्यक्ष अमरजीत सिंग कॉलरा,प्रदेशसरचिटणीस राजू पाटील सिपांळकर,मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडित तिडके,विभागीय अध्यक्षा विजयाताई काचावार,प्रदेश सेक्रेटरी मेघनाताई ,प्रदेश सेक्रेटरी बालासाहेब कदम,नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष नागमणी बालानी यामनवार,प्रदेश सचिव डॉक्टर मनिष तिवारी, जिल्हा अध्यक्ष उत्तर नांदेड विजयालक्ष्मी संजय काळे व प्रमोदजी केंद्रे साहेब,हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष रमेश कुटे,जिल्हा अध्यक्ष किशान विभाग शंकररावजी देशमुख, तालुका अध्यक्ष सेनगाव गजानन टेकाळे उपस्थित होते यावेळी नवीन महिला पदाधिकाऱ्यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने निवड करण्यात आली व राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या...

