संगमनेर । प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):
संगमनेर तालुक्यात सापडले कोरोनाचे ५५, रुग्ण याबाबतची माहिती संगमनेरचे तहसीलदार , अमोल निकम यांनी दिली आहे.
संगमनेर दिनांक १५-३-२०२१ रोजी संगमनेर मध्ये ५५ जणांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. अशी माहिती अमोल निकम यांनी दिली व आता संगमनेर शहरात कारोना बाधित त्यांचा आकडा दिवसें दिवस वाढत आहे. जर असाच संगमनेरचा आकडा वाढत राहिला तर लवकरच संगमनेर मध्ये लॉकडाऊन चा विचार करण्यात येईल.
लोकांनी गर्दी करणे टाळावे , मास व सॅनिटायझर चा वापर करावा अशी विनंती अमोल निकम यांनी केली आहे.

