shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड शहरात छळचा प्रकार दहा तोळे सोने आणण्याची मागणी करत विवाहितेला मारहाण..!!

पिंपरी चिंचवड:-लग्नात 15 तोळे सोने देण्याची मागणी केली होती. त्यातील पाच तोळेच सोने दिले आहे. उरलेले 10 तोळे सोने आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्यादी विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे.


पती सुनील नाथनाथ माने, सासू, सासरे, दीर, नणंद (सर्व रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 मे 2018 ते 3 मार्च 2021 या कालावधीत शिलॉंग मेघालय, चिखली आणि जुन्नर येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तुझ्या वडिलांना आम्ही 15 तोळे सोने देण्यासाठी सांगितले होते. परंतु तुझ्या वडिलांनी फक्त पाच तोळे सोने दिले आहे. तू तुझ्या आई वडिलांकडून 10 तोळे सोने घेऊन ये’  अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेला घालून पाडून बोलत शिवीगाळ केली. विवाहितेला मारहाण करून तिला वाईट वागणूक दिली. तिचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
close