shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी येथे मला हप्ते दे. मी इथला भाई धमकी देत टोळक्याचा काळेवाडीत राडा..!


पिंपरी चिंचवड:-सिगारेटचे पैसे मागणा-या टपरी चालकाला कोयता, लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्याला मारण्याची धमकी दिली. टपरीतील सामान वास्तव्यास फेकून नासधूस केली. त्यानंतर ‘मला हप्ते दे. मी इथला भाई आहे. आम्हाला जे हप्ते देणार नाही, त्याची अशीच गेम करू’ अशी धमकी देत टपरीमधील पैशांवर दरोडा टाकला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) रात्री पवनानगर काळेवाडी येथे घडली.

वैभव गायकवाड, आदित्य संतोष चोथे, मिथुन उर्फ मितेश जाधव, सागर दिवे, सचिन उर्फ बॉण्ड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दीपक पोपट मुंगसे (वय 23, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुंगसे यांची पवनानगर, काळेवाडी येथे जोतिबा गार्डन जवळ मामा पान शॉप नावाची टपरी आहे. आरोपी वैभव याने बुधवारी मुंगसे यांच्या टपरीवर येऊन सिगारेट घेतली. त्याचे पैसे मुंगसे यांनी मागितले. त्या रागातून वैभव शुक्रवारी त्याच्या साथीदारांना घेऊन मुंगसे यांच्या टपरीवर आला.

‘मला हप्ते दे. मी इथला भाई आहे’ असे म्हणून वैभव याने कोयता हवेत नाचवला. ‘तू माझ्याकडे पर्वा सिगारेटच्या पाकिटचे पैसे का मागितले, तुला आता दाखवतोच’ असे म्हणून वैभव याने टपरीमधील सामानाची नासधूस केली.

दिवसभराचा गल्ला सुमारे तीन हजार रुपये वैभव याने जबरदस्तीने काढून घेतले. कोयता फिरवरून रस्त्यावर दहशत निर्माण केली. ‘आम्हाला जे हप्ते देणार नाही त्यांची अशीच गेम करू’ अशी धमकी देत वैभव फिर्यादी मुंगसे यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून आला. मुंगसे त्याला घाबरून पळून जात असता वैभवच्या साथीदारांनी त्यांचा पाठलाग करून लोखंडी रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
close