अहमदनगर तू फक्त करच भर,
आणि पाऊस आला तर,
खड्ड्यात पाणी भर,
गाडी चालवून मणक्याचे हाल कर,
करा वर कर स्थानिक कर,
होत नाही विकास तरी पण भर;
इथे कर भरुनही नाही विकासाची सर; राजकारनाच्या चक्कीत तू मात्र मर;
नाली स्वच्छ नाही, कचर्याचा थर,
रस्त्यावर खड्डे पण रोड टॅक्स भर,
नळाला पाणी रात्री बेरात्री तीन चार दिवसा आड़ ,पण पाणीपट्टी तू नियमित भर..
वाह रे वाह नगर,
तुझीच सहनशक्ती तुच सहन कर,
वाह रे वाह अहमदनगर ,
आपल अहमदनगर भारी
आपल्या नगर ची लोक भारी
आपल्या लोकांनची सहनशक्तीच लय भारी ...!!!
एक नगर 'कर'

