shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संजय सानप यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या शहराध्यक्षपदी निवड

संजय सानप यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या शहराध्यक्षपदी निवड

 

इंदापूर प्रतिनिधी: ( दि.१५)भाजपाप्रणीत अनुसूचित जाती मोर्चाच्या इंदापूर शहर अध्यक्षपदी युवा नेते संजय सानप यांची निवड करण्यात आली.
 ( दि १५ मार्च )रोजी सकाळी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील, अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा सचिव विठ्ठल मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निवडीचा कार्यक्रम पार पडला.
      हर्षवर्धनजी पाटील म्हणाले की,' संजय सानप यांच्या रुपाने भाजपाला एक नवीन चेहरा मिळाला असून समाजातील सर्व घटकातील लोकांच्या अडचणी सोडवण्यास ते सक्षम असतील.
   यावेळी नुतन शहराध्यक्ष संजय सानप म्हणाले की,' इंदापूर शहरातील अठरापगड जातीतील लोकांच्या अडी-अडचणी सोडवण्याचा व शाहू,फुले,आंबेडकरांचा विचार मी समाजासमोर मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत राहील.
  अनुसूचित जाति मोर्चा चे पुणे जिल्हा सचिव विठ्ठल मिसाळ म्हणाले की,' या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हाधक्ष मयूर कांबळे यांच्या विचाराने आम्ही यापुढे पक्ष वाढवण्याच्या हेतूने प्रयत्न करणार असून सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे आम्ही सर्व जण मिळून प्रयत्न करू.
  यावेळी भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरद जामदार, जिल्हा कार्यकारणी सदस्य महेंद्र चव्हाण,जिल्हा संयोजक सचिन मोरे,भाजपा इंदापूर शहराध्यक्ष शकीक सय्यद,भाजपाचे नेते पांडुरंग शिंदे,ललेद्र शिंदे,बंडा पाटील, भाऊसाहेब शिंदे, सागर साळुंखे,अनिल सिध्दापुरे, प्रशांत उंबरे,उदय जाधव,संतोष देवकर,रणजित ढावरे,अरविंद ढावरे, संदीप चव्हाण व शहरातील युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close