shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोहा कंधार मतदारसंघात आ. शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामाचे भूमिपूजन ..!


लोहा (प्रतिनिधी )
लोहा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाच्या 2  कोटी 36 लक्ष रु  कामाचे भूमिपूजन काल दिनांक 7 मार्च रोजी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम आण्णा पवार ,काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत पवार ,युवा नेते रोहित पाटील शिंदे ,कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, उपविभागीय अभियंता गुरले, शाखा अभियंता वैजनाथ दाडगे उपस्थित होते. गेल्या कित्येक वर्षापासूनलोहा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाला मोठी इमारत नव्हती, इमारतीची कमतरता पाहून आमदार शामसुंदर शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामा साठी निधी मिळावा म्हणून आ. शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकामासाठी 2 कोटी 63 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता, या  नूतन इमारत बांधकामाच भूमिपूजन काल रविवारी आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, 

यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. शिंदे म्हणाले की मतदार संघातील 8 गोदामासाठी 49 कोटी रुपयांचा निधीस शासनाने मंजुरी दिली असून मराठवाड्यात सर्वाधिक आठ गोदामाला लोहा व कंधार मतदारसंघात शासनाने जास्तीच्या संख्येने मंजुरी दिली असल्याचेहीं आ . शिंदे यांनी यावेळी सांगितले . यासह काल रविवारी कंधार तालुक्यतील बारुळ येथे 1800मेगा टन क्षमतेच्या शासकीय गोदामाचे ही भूमिपूजन आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते झाले, यावेळी नामदेव महाराज,जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, कंधार बाजारसमितीचे उपसभापती अरुण पाटील कदम,संतोष गोगद्रीकर, तहसीलदार वेंकटेश मुंडे,उपविभागीय अभियंता जोशी, संदीप उमरेकर, संभाजी पाणपट्टे ,प्रफुल येरावर सह कार्यकर्ते उपस्थित होते,  लोहा ,कंधार मतदार संघातील उपजिल्हा रुग्णालयाला, नवीन गोदाम बांधकाम ,नवीन रस्ते ,साठवण तलाव व कवठा पुलकम बंधाऱ्याला ही  आ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे भरघोस निधी शासनाने दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकाम झाल्यानंतर याच इमारतीच्या वर कर्मचाऱ्यांना निवास्थान होण्यासाठी ही मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले , यावेळी या कार्यक्रमास गंगाधर सूर्यवंशी, ज्ञानोबा पाटील पवार, संचालक सुधाकर ,शेरू भाई विशाल चिंचोलीकर सह बहुसंख्येने कार्यकर्ते सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.
close