shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर औरंगाबाद महामार्गावरील दरोड्यातील दोन आरोपींना ७ वर्षांची सक्त मजुरी व दंड ..!

नगर औरंगाबाद महामार्गावरील दरोड्यातील दोन आरोपींना ७ वर्षांची सक्त मजुरी व दंड
नेवासा सत्र न्यायालयाचा निकाल प्रतिनिधी मोहन शेगर 
सोनई : दि.०३/०७/२०१६ रोजी मध्यरात्री चे वेळी नगर औरंगाबाद हायवे रोडवरील पंजाबी ढाब्याचे ठिकाणी झापवाडी शिवारात हायवे रोडने जाणारे मालट्रक नं एम.एच२९ टीसी १७४ वरील चालक व क्लिनर यांना इंडीका कारमधील ४ चोरट्यांनी ट्रकचा डॅश लागला या कारणावरुन नेवासा फाट्यापासून नमुद ट्रक चा रस्तालुटीचेइराद्याने पाठलाग केला. 
मोकळ्यापटांगाणामध्ये ट्रक आडवुनट्रक मधील इसमांनालाकडी दांड्याने मारहान करत १२०६० रुपये रोख व १५०० रु किन्मतीचा फोन चोरुन नेला व ट्रकची नुकसान केली. सदर घटनेबाबत सोनई पोलिस स्टेशन मध्ये अनोळखी दरोडेखोरांविरोधात गुन्हा रजि नं८७/२०१६ नुसार भा.द.वि.का.कलम ३९४,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. अल्पशा काळातच गुन्हा उघडकीस आणुन आरोपी१) अजय भाऊसाहेब चव्हाण, २) सागर अर्जुन मोहिते, ३) अजय भिमराज माळी, ४) विजय भिमराज माळी रा.पिंप्री वळण, ता-राहुरी या गुन्ह्याचे तपासात अटक करण्यात आले.तसेच सह आरोपी ५) चंद्रकांत भिमराज माळी रा.पिंप्रीवळण यास निष्पन्न करण्यात आले. 

सदरचा खटला मा. अति जिल्हा वसत्र न्यायालय नेवासायांचे न्यायालयामध्ये सुरु झाल्यानंतर मा.श्री मनोज पाटील, पोलीस अधीक्षक अ.नगर मा.डॉ.श्रीमती दिपाली काळे अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर मा.शी सुदर्शन मुंढे, उपविभागीयपोलीस अधिकारी शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठअ‍ॅण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक आर .टी.कर्पे तसेच कोर्ट पैरवी पो.कॉ.अनिलजाधव यांनीप्रि ट्रायल मिटींग्ज घेवुन साक्षीदारांना मा.न्यायालयासमोर साक्ष देण्याबाब्त मार्गदर्शन केले. 

०५/०३/२०२१ रोजी न्यायाधिश तपकिरे यांनी आरोपी क्रमांक १) अजय भाऊसाहेब चव्हाण व २) सागर अर्जुन मोहिते यांना भा.द.वि.का.क ३९७ कलमाखाली ७ वर्षे सक्त मजुरी व ५०००/-रु दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद भा.द.वि ४२७ कलमाखाली दोन्ही आरोपीना ६ महिने साधी कैद व ३०००रु द्रव्य दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपीक्रमांक ३ याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. आरोपी क्रमनक ५ फरार असल्याने स्टॅन्डींग वॉरंट जारी केलेआहे.
close