shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे येथील वांबोरी रोडवरील स्ट्रीटलाईट अखेर झाले सुरु.!

देहरे । प्रतिनिधी (निरज जेठे ):-
नगर तालुक्यातील देहरे - वांबोरी रोडवरील दलीत वस्ती सुधार योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या २०१९-२० मधील स्ट्रीट लाईटचे काम एक वर्षापासून काही कारणास्तव बंद होते. तेथील वस्ती वरील लोकांच्या अडचणी समजून न घेताच सदर काम सुरु करण्यात आले होते. त्यापुर्वीही सदर वस्तीवर चार वर्षांपासून हायमॅक्स बसवण्यात आले होते. परंतु सदर हायमॅक्स तीनच महिन्यांत बंद पडले. त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये अनेकांनी तक्रार करूनही त्याकडे सरप़ंच, सदस्यांनी व ग्रामप़ंचायतने देखील अजिबात लक्ष दिले नाही. त्यामुळे हायमॅक्स सलग तीन वर्षे बंद होते. 

त्यानंतर आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान दलीत वस्ती सुधार योजनेतून १८ खांब टाकून स्ट्रिट लाईट चे काम करण्यात आले, परंतू वस्ती वरील रहीवाशांना विचारात न घेताच सदर काम करण्यात आले होते. त्यानंतर सदर कामाची वस्ती वरील एका व्यक्तीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समिती नगरच्या गट विकास अधिकारी यांचेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे नगरच्या गट विकास अधिकारी यांनी सदर काम तक्रार निरसन होई पर्यंत ठेकेदारास काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सदर कामाचे खांब उभे करण्यात आले होते. पऱंतू लाईट लावण्यासाठी परवानगी नसल्याने सात महिन्यांपासून बंदच होते. 

   
वांबोरी रोडवर देहरे गावातील अनेक महिला व पुरुष व्यायाम करण्यासाठी पहाटे व सायंकाळी ये जा करतात. अशा वेळी अंधारामुळे भीती वाटणे साहजिकच आहे. या रोडवर नेहमी वर्दळ असते. ग्रामपंचायत निवडणूका झाल्या नंतर जनसेवा ग्रामविकास पॅनलची सत्ता अस्तित्वात आल्यानंतर वरील सामान्य लोकांचा विचार करत संजय लांडगे, मेघनाथ धनवटे, सरप़ंच बबन करंडे यांनी तक्रारदार व ठेकेदार यांच्यात समेट घडवून चर्चा घडवून आणून तक्रार मागे घेण्यासाठी विनंती केली, व तक्रारदार यांच्या मागणीप्रमाणे तात्काळ काम करून दिले. त्यामुळे तक्रारदार यांनी तक्रार मागे घेतले. यामुळे पुढील काम सुरळीत चालू झाले.
काल दिनांक ७ मार्च २०२१ रोजीच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल पटारे , बबन करंडे,पत्रकार रमेश जेठे यांचे शुभहस्ते स्ट्रीट लाईट चालू करण्यात आले. यामुळे वांबोरी रोडवर चमकदार लाईटमुळे लख्ख प्रकाश पडल्यामुळे देहरेकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे. सदर बंद असलेले स्ट्रीट लाईट चालू झाल्यामुळे नवीन सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे देहरेकरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.


यावेळी सरपंच बबन करंडे , अरुण लांडगे , विठ्ठल पठारे , संजय लांडगे , मच्छिंद्र पठारे , मेघनाथ धनवटे , डॉ. अनिल लांडगे , चेअरमन भाऊ काळे , पत्रकार रमेश जेठे , भाऊसाहेब काळे , वायरमन संदिप गायकवाड , सुहास पाखरे , ॲड.गणेश विटकर , लक्ष्मण लष्करे , शिवाजी विटकर व भाऊ काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
close