shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केजच्या बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात रसायन शास्ञातील नवे प्रवाह व आव्हाने या विषयावर अॉन लाईन आंतरराष्ट्रीय परिषद..!!

                    

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :-              
केज येथील छञपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात अॉन लाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि.10 मार्च 2021रोजी करण्यात आले असुन याचे उदघाटन अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या शुभ हस्ते होणार असुन या परिषदेच्या अध्यक्ष स्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायन शास्ञ विभागाचे विभाग प्रमुख डॉ.मच्छिंद्र लांडे हे राहणार आहेत.                                  

या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये रसायन शास्ञातील नव्या प्रवाहावर सौदी अरेबिया येथील शास्ञज्ञ डॉ.वाल्मिक शिंदे ,व आय.आय.टी.जोधपुर डॉ.रोहन एरंडे चर्चा करणार आहेत.या परिषदेसाठी राज्यातील व पर राज्यातील 200 संशोधकांनी रजिस्ट्रेशन केले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.जी.फावडे यांनी दिली आहे.                             

या संयोजन समितीत विभाग प्रमुख डॉ.अनिल किर्दंत,डॉ.अनिल गायकवाड,डॉ.सुरेश कांबळे ,डॉ.बालासाहेब शितोळे व डॉ.महादेव सुवर्णकार आहेत.
close