shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांचेमुळे बावडा व भिगवन रुग्णालयांची उभारणी - - जि.प. सदस्या अंकिता पाटील

हर्षवर्धन पाटील यांचेमुळे बावडा व भिगवन रुग्णालयांची उभारणी -
   - जि.प. सदस्या अंकिता पाटील 
इंदापूर: प्रतिनिधी (दि. २३मार्च.२१)
              इंदापूर तालुक्यात बावडा ग्रामीण रुग्णालय व भिगवन ट्रामा सेंटर या रुग्णालयांची मंजुरी व त्यांनतर उभारणीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वर्षे पाठपुरावा  केला. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांच्या उभारणीचे श्रेय इतरांनी घेऊ नये,असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी मंगळवारी (दि.२३) केले. 
                   सन २०२१ मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री असताना बावडा उपकेंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयामध्ये केले. तसेच जागतिक बँकेकडून बावडा ग्रामीण रुग्णालय व भिगवन ट्रामा सेंटरच्या इमारतीसाठी विशेष बाब म्हणून निधी मंजूर  केला.
         बावडा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत उभारणीसाठी जिल्हा परिषद सदस्या म्हणून मी जिल्हा परिषदेमध्ये अधिकार्‍यांकडे सतत पाठपुरावा केला. इमारतीचे इन्स्पेक्शन करून घेतले. तसेच बावडा रुग्णालयातील यंत्रसामुग्री व बेडसाठी सीआरएस फंडातून १० लाख रुपये मी मंजूर करून घेतले, असे अंकिता पाटील यांनी नमूद केले.
              तसेच या दोन्ही रुग्णालयांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या जागा मंजूरीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केला तसेच वारंवार पत्रव्यवहारही केला. त्यामुळेच या दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी मिळून सुसज्ज अशी रुग्णालये उभी राहिली आहेत. मात्र आता या रूग्णालयांच्या उभारणीचे श्रेय इतर घेत आहेत. मात्र जनतेला वस्तुस्थिती माहित आहे, असे अंकिता पाटील यांनी स्पष्ट केले.
             त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर  आपल्या मंत्रिपदाच्या काळात उपजिल्हा रुग्णालयात केले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा तालुक्यातच उपलब्ध झाल्याची माहितीही जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी दिली.
_______________________________
close