shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रशासनाकडून लग्न सोहळा उत्साहाने साजरा करणाऱ्यांवर कारवाई... !

संगमनेर । प्रतिनिधी : ऋषिकेश जगताप
संगमनेर तालुक्यातून जवळपास संपुष्टात आलेले कोविड संक्रमण काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा जोमाने सुरु झाले आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये झालेल्या काही विवाह सोहळ्यांनी अवघ्या तालुक्याच्या स्वास्थावरच हल्ला चढवला असून अनेकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडले आहे. 

कोविड संक्रमणाला कारणीभूत ठरलेल्या अशा काही सोहळ्यांवर कारवाई करतांना प्रशासनाने आयोजनकर्त्यांवर दहा हजारांच्या दंडाची कारवाई केली आहे, मात्र अशा सोहळ्यांना उपस्थित राहीलेले आणि कोविडने जायबंदी होवून रुग्णालयांमध्ये दाखल झालेले कर्ज काढून आता लाखांची बिलं भरीत आहेत.प्रशासनाकडून विवाह सोहळ्यातील उपस्थितीला मर्यादा घातलेल्या असतानाही अद्यापही तालुक्यात काहीजण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. 

त्यामुळे दिवसागणिक संगमनेर तालुक्यातील कोविडची स्थिती चिंताजनक होत आहे. काही जणांच्या अविचारी कृतीचा फटका संपूर्ण तालुक्याला बसत असल्याने प्रशासनाने कारवाईच्या पद्धतीत बदल करुन असे सोहळे आयोजित करुन संपूर्ण तालुक्याचे स्वास्थ बिघडवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची गरज सामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच केवळ जंगी सोहळे आयोजित करणार्‍यांवरच नव्हेतर अशा सोहळ्यांना हजेरी लावणार्‍यांवरही कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.
close