व्याहाळी व काटी केंद्रातील महिला शिक्षिकांचा महिलादिनी सन्मान
इंदापूर प्रतिनिधी: (दि. ८ मार्च २१.) रोजी व्याहाळी व काटी केंद्रातील महिला शिक्षिकांचा सन्मान पुस्तक, शाल व गुलाबपुष्प देऊन निमगाव बीट चे विस्तार अधिकारी सुनील मूगळे, केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांच्या हस्ते जि प प्राथ शाळा निमगाव येथे व्यहाळी व काटी केंद्राच्या वतीने करण्यात आला.व्याहाळी केंद्रातील महिला शिक्षिका जयश्री मिसाळ, मोनाली जौजाळ, सुजाता भोंग,गीतांजली जाधव,रत्नमाला भोंग,मनीषा शेंडे,सुवर्णा शिंदे,प्रतिभा जौजाळ, आशा नष्टे,सुनीता लकडे,आश्विनी भोंग,राजेश्री मदने,मंजुषा धारूरकर,आरती गायकवाड, लक्ष्मी गुंड,अर्चना लाळगे व काटी केंद्रातील दीपाली बनकर,अर्चना चव्हाण,रोहिणी म्हेत्रे,प्रभावती भोंग,सुनीता भोंग,रोहिणी सुरवसे,आशा पुणेकर,जयश्री अभंग,सुचिता कोकाटे, उषा सलगर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित विस्तार अधिकारी सुनील मूगळे व केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांचा देखील सत्कार करण्यात आला.प्रभावती भोंग मॅडम व प्रतिभा जौजाळ मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक संभाजी आजबे यांनी केले.महिला दिनी उपस्थित शिक्षिकांना सुनील मूगळे साहेबांनी शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन व विध्यमान संचालक किरण म्हेत्रे यांनी केले तर आभार आदर्श शिक्षक अजिनाथ आदलिंग यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन व विध्यमान संचालक किरण म्हेत्रे, शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन व विध्यमान संचालक नितीन वाघमोडे, शिक्षक पतसंस्थेचे माजी संचालक भारत ननवरे,गणेश लाळगे,राजकुमार भोंग, सतेश भोंग,अजिनाथ आदलिंग यांनी परिश्रम घेतले.कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम पार पडला.

