shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी झगडेवाडीतील प्रस्तावित वीज केंद्राचे तातडीने काम चालू करण्यासंदर्भात दिल्या सूचना.. अतुल झगडे..!!

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी झगडेवाडीतील प्रस्तावित वीज केंद्राचे तातडीने काम चालू करण्यासंदर्भात दिल्या सूचना.. अतुल झगडे..!!
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी झगडेवाडी येथील प्रस्तावित वीज केंद्राचे तातडीने काम दोन महिन्याच्या आत चालू करण्यासंदर्भात संबंधित वीज अधिकारी यांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सूचना दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिली.

झगडे वाडीतील प्रस्तावित वीज केंद्राचे तातडीने निर्णय घेऊन निमगाव केतकी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेती पंप चालवण्यासाठी कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने विजेअभावी शेती पिकांचे नुकसान होत असल्याने तसेच पंचक्रोशीतील लाईट संदर्भात निमगाव केतकी येथील १२८ कोटीच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी सदर व्यासपीठावर राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना झगडेवाडी येथील प्रस्तावित वीज केंद्राची कार्यवाही संदर्भात मागणी केली असता त्यांनी तातडीने वीज विभागाच्या अधिकाऱ्याशी फोनवरून संपर्क साधत सदर ठिकाणच्या वीज पुरवठा सुरळीत व्हावी तसेच प्रस्तावित असलेल्या वीज केंद्राचे येत्या दोन महिन्यांमध्ये काम चालू करावे व त्याचे उद्घाटनही दोन महिन्याच्या आत घ्यावे अशा सूचना दिल्या.
सदर निमगाव केतकी झगडेवाडी तरंगवाडी सह इतर गावांना भविष्यात वीज पुरवठा उच्च दाबाने होणार असून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आमची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांचे पंचक्रोशीतील सर्व गावांच्या वतीने जाहीर आभार करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे म्हणाले.
close