मुरूड प्रतिनिधी:-विकास मेहेतर
सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा होळी-धुलिवंदन निमित्त रविवार दिनांक 29/3/2021 रोजी मुरूड तालुक्यातील धावीर देव वेळास्ते या क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्या वेळास्ते या गावी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघांनी भाग घेतला होता या, या स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे जय हनुमान डाकेली ( ओपन ) बक्षीस प्रथम क्रमांक 25000 रु आणि चषक द्वितीय क्रमांक श्री राधाकृष्ण वांदेली बक्षीस 12000 रु आणि चषक सर्व विजेत्या संघांचे श्री धावीर देव वेळास्ते या संघाकडून अभिनंदन करण्यात आले ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यामागे मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे वेळास्ते गावचे ग्रामस्थ तसेच महिला मंडळ आणि मुंबई मंडळ आणि सर्व क्रिकेट खेळाडू या सर्वांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली

