shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनईत स्नेह फाऊंडेशनच्या वतीने फिटनेस व योगा क्ल्यास केंद्राचे उदघाट्न,सुनीताताई गडाख यांच्या हस्ते.. !

प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई  माजी विद्यार्थी संघाच्या गोल्डन ग्रुपने स्थापन केलेल्या स्नेह फाऊंडेशनच्या वतीने सोनईत फिटनेस व योगा क्लास सेंटरचे उदघाटन माजी पंचायत समितीच्था सभापती सुनिताताई गडाख यांच्या हस्ते संपन्न झाले.


    
सोनई- स्नेह फाऊंडेशनच्या वतीने पत्रकार विनायक दरंदले यांना कोरोना योद्धा पुरस्कार देतांना पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख. दुसरे छायाचित्र आशा सेविकांचा झालेला सन्मान. 
छायाचित्र; किरण दरंदले

जगदंबादेवी मंदीर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता जोरवर-पिसाळ यांनी केले.या उपक्रमाची माहिती संजय गर्जे यांनी दिली. कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.अभिराज सुर्यवंशी,जिल्हा परिषद सदस्या सुरेखा साळवे, ओमशांतीच्या उषादिदी,विठ्ठल खाडे महाराज, मोहनराव दरंदले उषाताई दगडे,सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकाळे उपस्थित होते. 

     उपस्थित मान्यवरांचा सत्कार सुभाष सोनवणे,बापू गोसावी, डाॅ.संजय तुवर,संदीप बेल्हेकर, महेश कडेल यांनी केला.फाऊंडेशच्या वतीने कोरोना संसर्ग काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या डाॅ.सुर्यवंशी,डाॅ.राजेंद्र कसबे.

पत्रकार विनायक दरंदले सह आशा सेविकांचा कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. 

   सुनिताताई गडाख,उषा दगडे,विनायक दरंदले, डाॅ.संतोष गुरसळ,डाॅ.सुर्यवंशी यांचे भाषण झाले. 

कार्यक्रम यशस्वी करणेकामी मनिषा जवादे,प्रमोद शहा,गवळी,अनिल वने,तागड मेजर,अनिल वाघ, संजय दळे,राजेंद्र सानप,तांदळे, भाऊराव भुसारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन नितीन दरंदले यांनी केले. आभार संतोष क्षीरसागर यांनी मानले.
close