लासुर्णे येथे राजवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त तालुकास्थरीय भव्य कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
इंदापूर प्रतिनिधी:(दि. ६ मार्च.२१) रोजी जनसामान्यांचे नेतृत्व राजवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत लासुर्णे येथे सिध्दीविनायक जगताप व मित्रपरिवार सोमनाथ भोसले अध्यक्ष, जिव्हाळा फाऊंडेशन, एस.आर .पी .ग्रुप आयोजित राजवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त तालुकास्थरीय भव्य कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
या स्पर्धाचे आयोजन सिध्दीविनायक जगताप व मित्रपरिवार , सोमनाथ भोसले अध्यक्ष, जिव्हाळा काऊंडेशन, एस.आर .पी .ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, आपल्या नेतृत्वाचा वाढदिवस कब्बडी खेळाच्या स्पर्धाच्या माध्यमातून करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कब्बडी या सांघिक खेळाचे महत्व वाढत असताना तालुक्यातून गुणी खेळाडूंना प्रेरणा देण्याचा हा चांगला प्रयत्न आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २५,०००/- व चषक (जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असो. इंदापूर यांचे वतीने) व द्वितीय पारितोषिक १५०००व चषक ( अँड हेमंतराव दशरथ नरुटे सदस्य पंचायत समिती इंदापूर यांचे वतीने ) तृतीय पारितोषिक १००००व चषक ( अमित चव्हाण सदस्य ,ग्रामपंचायत लासुर्णे यांच्यावतीने ) बक्षीसे ठेवण्यात आली असून चषक सौजन्य गजानन (भाऊ) वाकसे (सरचिटणीस भा. जनता पक्ष प. महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडी यांचे लाभले आहे.
तसेच काही वैयक्तिक बक्षीसे उत्कष्ठ चढाई साठी रु १००० मेघराज मोहन निंबाळकर यांच्या वतीने, उत्कृष्ट पकड रू १००० मोहन निंबाळकर यांचे वतीने शिस्तबद्ध संघ रु १००० निलेश लोंढे यांच्या वतीने ठेवण्यात आले आहेत.
या सामन्यांसाठी आयोजनासाठी विशेष सहकार्य प्रमोद खोमणे,अरुण कांबळे, आकाश भोसले ,विक्रम मोरे(मा.सरपंच वा.नगर), विशाल जळक. निलेश लोढे, धर्मराज पवार, रघु गौड, तुषार लोंढे, अमोल गायकवाड, रोशन अहिवळे, साजन लोंढे, बंटी लोंढे, ओंकार लोंढे, विकास गायकवाड, वैभव चव्हाण, किरण मिसाळ, योगेश चव्हाण, संमेध सासवडे, दत्ता पवार, अभि गांधी, सुदर्शन सासवडे,गणेश जगताप, चैतन्य जगताप, ऋषिकेश खरात, रोहित लोंढे, पप्पु लोंढे, विशाल सोनवणे, उमेश लोदाडे, कुणाल लोदाडे, दाऊद बागवान, समाधान भोसले, व इतर आयोजकांनी या सामन्यांसाठी विशेष परिश्रम घेतले असून त्यांचे यावेळी राजवर्धन पाटील यांनी कौतुक करत सामने यशस्वी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या व बक्षीस दिलेल्या संस्थाचे व प्रतिष्ठित मंडळीचे यावेळी मनःपूर्वक आभार मानले. व नाणेफेक करून कबड्डी सामन्यांचे उद्घाटन केले.

