(रस्त्यात गुडघाभर खड्डे)
प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी :-
सारणी ते आनंदगाव रहदारीचा रस्ता हा अत्यंत खराब झालेला आहे चक्क रस्त्यावर बुडावर खड्डे पडलेले आहेत नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आनंदगाव ते केज हा बाजारपेठ साठी अत्यावश्यक रस्ता. व्यापारी ,विद्यार्थी शेतकरी ,कर्मचारी या रस्त्याने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात हा रस्ता उखडलेला आहे. गूढघाबर खड्डे पडल्याने दुचाकी चालवणे ही कठीण झाले आहे. खड्डे पडल्यामुळे वाहनांना अपघाताचे प्रमाणही वाढले आहे तात्काळ हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
आनंदगाव ते सारणी हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. तो दुरुस्त करण्यात यावा यासाठी अनेक वेळा मागणी करून रस्ता केला जात नाही
हा रस्ता तात्काळ डांबरीकरण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल
अशोक भोगजकर
उपसरपंच आनंदगाव
या रस्त्याने वागणे अवघड झाले.अनेक वेळा वाहने घसरून पडत आहेत. पण लक्ष कोण देणार हाच मोठा प्रश्न आहे स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य इकडे वळूनही पाहत नाहीत एकदा निवडून येतात ते पुन्हा माघारी फिरकत नाहीत.पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन निवडणूक लढवतात.युसूफवडगाव गटातील लोकांच्या नशिबी कायम वनवास आहे
नागरिक
---------------------------

