प्रतिनिधी । केज प्रकाश मुंडे :-
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील शेतकरी अमोल अनंत राऊत वय 32 वर्षे यांनी आपल्या वडीलाच्या कर्जबाजारीपणाच्या नैरास्यातून बुधवारी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ब-याच दिवसापासून वडिलांच्या कर्जबाजारीपणा बद्दल कुटूंबियात चर्चा होत होती. त्याच्यामुळे आलेल्या नैराश्यातून अमोल अनंत राऊत वय 32 वर्षे याने बुधवारी सर्व्हे नं.10/4 मधील हुरा नावाच्या शेतातील लिंबाच्या झाडा गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात थकलेले आई,वडील, पत्नी,2 मुली,1 मुलगा असा परिवार असून घरातील कर्ता माणूस गेल्यामूळे राऊत कुटुंब उघड्यावर पडले आहे.

