पुणे । प्रतिनिधी : पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरून गेल्या काही दिवसांपासून गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. 9 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीमध्ये 15 मार्चपासून परीक्षा घेण्यात येणार असल्याचं ठरलं होतं. पण जुन्या एका कंपनीला परीक्षेचा काम देणं हे नियमबाह्य असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे 15 मार्चला परीक्षा घेणे शक्य नसल्याचं सांगण्यात आलं.
विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरत असताना आता विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलून 11 एप्रिलला परीक्षा सुरू करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीचे असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एसएसपीयु एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी आता परीक्षा घेणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

