shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत सावित्रीबाईंना स्मृतिदिना निमित्त अभिवादन !!

भिमाई आश्रमशाळेत सावित्रीबाईंना स्मृतिदिना निमित्त अभिवादन !!
इंदापूर प्रतिनिधी: ( १०मार्च २१ )  :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी सावित्रीबाईंच्या प्रतीमेस संस्थाप्रमुख व इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रत्नाकर मखरे म्हणाले की, महिला, बहुजन समाजातील लोकांना अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून शिक्षणाची कवाडे खुली करून देणाऱ्या पैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले होत. सावित्रीबाईंनी अनंत अडचणीवर मात करून आपले संपूर्ण आयुष्य स्रीयांच्या न्याय हक्कासाठी वेचले. प्रथम शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी स्री शिक्षणाचा पाया रचला.
समाजोद्धाराचा वसा नेटाने पुढे नेण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.जोतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाईंनीच केले. व त्या खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाल्या .सावित्रीबाई ह्या समाजसेविका म्हणून अनेकांना ठाऊक होत्या, मात्र त्या उत्तम कवियत्री देखील होत्या.असे मत मखरे यांनी बोलतांना व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेतील प्राचार्य, उपप्राचार्या,मुख्याध्यापक,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीेतेसाठी चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
close