वडाळा महादेव(वार्ताहर):- वडाळा महादेव येथील सर्वांना परिचित असलेले धार्मिक विधी करणारे गुरुजी पुजा पाठ,धार्मिकविधी, सामाजिक कार्यात सदैव सहभागी होणारे रामभाऊ लक्ष्मण थावरे गुरुजी (वय ७५) यांचे शनिवारी २७/३/२०२१ व्रुद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन,दोन भाऊ,दोन बहीण असा मोठा परीवार आहे.
घर, मोठ्या इमारतींना कलरकाम करणारे विलास थावरे यांचे वडील आणि टेलिफोन विभागाचे दिलीप नवले यांचे ते मोठे मामा होते.

