मधुकर भरणे यांच्या हस्ते कॅफे कडक स्पेशल याचे उद्घाटन संपन्न
..!!
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर येथे वडापुरी गावचे सुपुत्र व उच्चशिक्षित आणि विद्यानिकेतन सायन्स अकॅडमी चे संस्थापक प्रा कुणाल काळे व सागर वाघमोडे यांनी इंदापूर अकलूज नाका, अरुण गॅलेक्सी इंदापूर या ठिकाणी कॅफे कडक स्पेशल या भारतीय जलपान याची उभारणी केली असून त्याचे उद्घाटन(दि.३०) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.
पुणे येथील सुप्रसिद्ध उत्तम चहाची अनुभूती देणाऱ्या या कॅफेचे इंदापूर शहर व तालुक्यातील तमाम ग्राहकांना गरम आणि थंड अशा पद्धतीची उत्तम दर्जाचे कडक आणि स्पेशल चहा ,कॉफी तसेच इतर कोल्ड्रिंक्स उत्तम
दर्जाची सेवा देणे या कॅफे चे उद्दिष्ट राहणार असल्याची माहिती प्रो प्रा कुणाल काळे यांनी यावेळी सांगितले.
या उद्घाटन समारंभासाठी तालुक्यातील मान्यवर इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख नितीन शिंदे ,शहर प्रमुख महादेव सोमवंशी, शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस दुर्वास शेवाळे
तसेच कुस्तीगीर संघाचे महेंद्र रेडके , भाजप चे भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी तरंगे, भारत हरणावळ सर ,पांडुरंग (तात्या) मारकड धनाजी पाटील, ठोंबरे सर, यमगर सर तसेच जय हनुमान व्यायाम शाळा वडापुरी चे संस्थापक अध्यक्ष किरण गोसावी, अरुण गॅलेक्स च्या शकुंतला (अक्का) झगडे व काळे परिवार आणि स्नेह मित्र यांनी या कॅफेच्या उद्घाटनास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

