शासनाच्या आदेशानुसार दिनांक ३०/०३/२०२१ रोजी कारखान्याचे चेअरमन मा श्री रमेशराव आडसकर यांच्या अध्यक्षतेखाली ११_०० वाजता कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते,
या सर्वसाधारण सभेत चेअरमन मा श्री रमेशराव आडसकर म्हणाले की, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील जुन्या कारखान्यापैकी एक आहे.या कारखान्याला कोणत्याही बॅंकेची आर्थिक मदत नसताना गेली विस वर्षांपासून चालू आहे,हि संस्था टिकावी म्हणुन आमच्या संचालक मंडळाचे कशोसीने प्रयत्न चालू आहेत, तरी भविष्यकाळात हि संस्था वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत व या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना,कामगांराना, शेतमजूरांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे चेअरमन आडसकर यांनी सांगितले. वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, व यावेळी सर्वांचे आभार चेअरमन रमेश आडसकर यांनी मानले याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक सभासद यांनी सभेच्या कामकाजात बहुसंख्येने ऑनलाईन सहभाग नोंदविला, यावेळी कार्यकारी संचालक एस बी साखरे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

