प्रतिनिधी । मोहन शेगर :
नेवासा--मागील वर्षी कोरोना परिस्थिती मुळे जो काही ञास शासकिय व आरोग्य यंञेणाला पडला तो पडु नये म्हणुण सोनई येथील पुर्वतयारीची आढावा बैठक आज भेंडा ता.नेवासा येथिल कोविड सेंटर येथे घेण्यात आली.
नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीस जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर,तहसिलदार रूपेशकुमार सुराणा,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.संदिप सांगळे,तालुका वैघकिय डाॅ.अभिराज सुर्यवंशी आणि तालुक्यातील महसुल पोलिस आरोग्य यंञणेतील अधिकारी वर्ग बैठकिस हजर होता.तालुक्यातील कोरोनाच्या रूग्णांत होत असलेली लक्षणीय वाढ होत आहे यासाठी तालुका आरोग्य यंञणेचे प्रमुख डाॅ.अभिराज सुर्यवंशी यांनी पुढील परिस्थिती व पुर्यतयारी साठी पाॅवर पाॅईंट प्रेझेंटेशन जिल्हाधिकारी यांना सादर केले.
अहमदनगरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले यांच्या प्रथमच तालुक्यात भेटी देवुन परिस्थितीचा आढावा घेत असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमेचे जनतेतुन स्वागत होत आहे.

