नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
नगर तालुक्यातील तांदळी वडगाव या ठिकाणी गेलेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळून आले होते. या आधी याचं ठिकाणी तिनं कँप घेण्यात आले होते. शनिवार(दि.17) रोजी या ठिकाणी रुईछत्तीसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रॅपीड ॲटिजन स्टेट कँप आयोजित करण्यात आला होता. आज या ठिकाणी एकुण तपासणी 107 रूग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मध्ये बांधीत रुग्ण 26 संख्या आढळुन आली आहे. 79 निगेटिव्ह आले तांदळी 11, वडगाव 5, साकत 1, मिरजगाव 2, बनपिंपरी 1, आरणगाव 2, रुईछत्तीसी 3, या आधीचे पाॅझिटिव्ह रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.
हा कँप यशस्वी होण्यासाठी तांदळी वडगावचे उपसरपंच वैभव मुनफन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिंगे, संरपच बाळासाहेब ठोंबरे, डॉ.यादव,जगदाळे मॅडम, आरोग्य सेवक भालसिंग, परिचारिका तांबोळी, आशा सेविका रेखा आंधळे,आशा सुपरवाझर विजया लंके, संजय पवार, दिपक घिंगे,रमेश ठोंबरे, विलास घिंगे आदी मान्यवरांनी कँप यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

