shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्या पासून‌ अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध लागू होणार..!


अहमदनगर :- जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज संध्याकाळी जिल्ह्यात चौदा दिवसांचा स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लागू करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्याच वेळी उद्यापासून नवीन निर्बंध लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी फेरआदेश काढले असुन आज मध्यरात्री बारा वाजेपासून 1 मे च्या सकाळी  7 वाजेपर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत नव्याने नियमावली जाहीर केली आहे.

आज मध्यरात्री बारा वाजेपासून ते 1 मे रोजी च्या सकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी कायम राहणार असून या दरम्यानच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांंनाही काल मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे रविवारपासून आता रस्त्यावर भाजीपाला व फळे मिळणार नाहीत. त्यासाठी केवळ घरोघरी जाऊन भाजी विक्री करणाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार 1 मे पर्यंत कोणत्याही लग्न सोहळ्याला परवानगी मिळणार नाही. यासोबतच चहाची दुकाने, अत्यावश्यक सेवा वगळून उर्वरित सर्व प्रकारची दुकाने, सर्व प्रकारचे कार्यक्रम, सर्व प्रकारची खासगी बांधकामे, सेतू कार्यालय, आधार कार्यालय, व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, मॉर्निंग वॉक करण्याची ठिकाणे, तसेच बेकरी व मिठाईची दुकाने पूर्णता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या किराणा दुकान, मटन, चिकन व मासे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी,  कृषी संबंधित सर्व सेवा व दुकाने, पशुखाद्य विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल या गोष्टी केवळ सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 11 वाजे नंतर यापैकी कोणतीही दुकाने सुरू राहणार नाहीत. याशिवाय भाजीपाला व फळे घरोघरी जाऊन विक्री करणाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. आदेशाचे तंतोतंत काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
close