shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आकाश उघडे यांचा आपल्या विवाहाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम हाती घेऊन तो राबवला विवाहा सोहळ्याचा लाखो रुपये खर्च टाळुन प्राथमिक शाळेत सुरु केली ऋणपूर्ती ठेव योजना...!



नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):-
नगर तालुक्यातील मठपिंप्रि गावात शुक्रवार ( दि.१६)  रोजी असाच एक आदर्श निर्माण करणारा विवाह सोहळा पार पडला शाळेच्या माजी विद्यार्थीने आपल्या विवाह सोहळ्यानिमित्त केलेला संकल्प गावाच्या प्राथमिक शाळेत सुरू केला ऋणपूर्ती ठेव योजना.

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने आपले लग्न उरकून घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंप्रीचा माजी विद्यार्थी आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन  सध्या पुणे येथे नोकरी करत आहे. आकाश दत्तात्रय उघडे व निकिता प्रकाश सरगर यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती सोबत चर्चा करून आपण शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शाळा ऋणपूर्ती ठेव योजना सुरू करण्याचा संकल्प केला होता.

 या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य पुरवणे तसेच गरीब कुटुंबांमधील एखाद्या मुलाला शिक्षणाचा खर्च साठी मदत करणे  तसेच दरवर्षी ही ठेव समृद्ध करण्याचा मानसही व्यक्त केला.

नवदाम्पत्या आकाश व निकिता यांनी संपूर्ण  तालुक्या पुढे नवीन आदर्श ठेवल्याबद्दल सर्व पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
close